आजच्या लेखकाला मराठीच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन झाले नाही, तर भिकार लेखकांनी लटपटी करून अध्यक्ष होण्याचे हे समारंभ बिनकामाचे ठरतात

आता एकभाषिक राजकारण फोफावले असले, तरी मराठी ही एका विशाल हिंदू महाव्यवस्थेत या उपखंडात विकसित झालेली एक व्यवस्था आहे, आणि आपल्या पोटभाषा - खानदेशी, अहिराणी, वर्‍हाडी, झाडी, कोंकणी याही मराठीच्या उपव्यवस्था म्हणून विकसित झाल्या पाहिजे. तरच मराठी ही प्रबळ होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ह्या सगळ्या मराठीच्या बोलींचाही सहभाग वाढवावा, असेही पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनाचा आढावा घेताना सुचवावेसे वाटते.......